भंडारदरा धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी खरीप पिकासाठी द्यावे

तालुका किसान सेलचे आमदार कानडे यांना निवेदन
भंडारदरा धरणाचे ओव्हरफ्लोचे पाणी खरीप पिकासाठी द्यावे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

भंडारदरा धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणारे ओहरफ्लोचे पाणी श्रीरामपूर तालुक्यातील खरीप पिकासाठी तसेच तळे व बंधारे भरण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी श्रीरामपूर तालुका किसान सेलच्यावतीने अध्यक्ष अजिंक्य उंडे यांनी आमदार लहू कानडे यांची भेट घेवून निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, पावसाने पाठ फिरवल्यामुळे लाभक्षेत्रातील खरीपाची पिके धोक्यात आली असून बळी राजा चिंतेत आहे. खरीपाच्या सर्व पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज आहे. अपुर्‍या पावसामुळे विहीरी, बोअर यांची पाण्याची पातळी खालावलेली आहे. तसेच महावितरणचा वीज पुरवठा सुरळीत नसल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची भीती शेतकरी वर्गाला भेडसावत आहे.

आ. कानडे यांनी, शेतकर्‍यांच्या भावना लक्षात घेवून पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांना सूचना देऊन व लेखी पत्राद्वारे धरणातील ओहरफ्लोचे पाणी चार्‍यांना सोडण्यात येऊन खरीप पिकांना देण्यात यावे, असे सुचविले असल्याचे सांगितले. गावतळी, शेततळी, बंधारे भरल्यास खरीप पिकांना जीवदान मिळून विहरी, बोअर यांची पाण्याची पातळी वाढेल. व शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल, असे आमदार कानडे यावेळी म्हणाले.

याप्रसंगी तालुका अध्यक्ष अरुण पा. नाईक, अशोक नाना कानडे, सतीश बोर्डे, राजेंद्र औताडे, हरिभाऊ बनसोडे, रामकृष्ण उंडे, मदन हाडके, अभिजित लीप्टे, सुरेश पवार, विशाल कांबळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com