भंडारदरा धरण ओव्हरफ्लो
सार्वमत

भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा समजले जाणारे भंडारदरा धरण Bhandardara Dam आज रविवारी सकाळी भरले. त्यामुळे लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Bhandardara Dam Overflow

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा 10 हजार 336 दलघफु झाला. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सकाळी ६ वाजता सांडव्याद्वारे २४३६ क्युसेक्स व विद्युतगृहाद्वारे ८३२ क्युसेक्स असे एकुण ३२६८ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत होते.

सकाळी धरणाची पाणीपातळी ७४३.९२० मीटर व पाणीसाठा १०३३६ दलघफू होता. अशी माहिती जलसंपदा विभागाचे सहाय्यक अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.

पाणलोट क्षेत्रातील आजचा पाऊस मिलिमीटर व एकूण पाऊस पुढील प्रमाणे -

घाटघर-245 (3915), रतनवाडी-240(3109)

पांजरे-145 (2742), वाकी-145(1747), भंडारदरा- 275(2371),

धरणातील पाणी साठा दलघफु मध्ये - (सायं 6 वाजता)

भंडारदरा - 10336(93.63%)

निळवंडे - 6126(73.63%)

मुळा - 17736(68.22℅)

आढळा - 713, (67.26%)

मुळा नदीचा कोतुळ येथील विसर्ग-10026 क्यूसेक

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com