भंडारदरा धरण आज होणार ओव्हरफ्लो

भंडारदरा धरण आज होणार ओव्हरफ्लो
भंडारदरा

अकोले |प्रतिनिधी| Akole

उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण (Bhandardara Dam) ओव्हरफ्लो (Overflow) होण्याच्या मार्गावर आहे. आज रविवारी सायंकाळ पर्यन्त धरण (Dam) काठोकाठ भरण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपासून धरण पाणलोट (Dam Watershed) क्षेत्रात मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. त्यामुळे धरणात (Dam) मोठ्या प्रमानात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. काल दिवस भराच्या 12 तासात धरणात (Dam) 236 दलघफु पाण्याची आवक झाली, काल सायंकाळी पाणी साठा 10 हजार 559 दलघफु झाला होता.

धरण 95.65 टक्के भरले असून सध्या सुरू असणारा पावसाचा (Rain) जोर लक्षात घेता उद्या रविवारी भंडारदरा धरण (Bhandardara Dam) 100 टक्के भरेल असा विश्वास भंडारदऱ्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख (Bhandardara Branch Engineer Abhijit Deshmukh) यांनी 'सार्वमत' शी बोलताना व्यक्त केला.धरण भरल्या नंतर स्पीलवे मधून ओव्हरफलोचे (Overflow) पाणी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, नियमानुसार धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने सायंकाळपासून विद्युतगृह क्रमांक 1 च्या टनेलमधून 820 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. नेहमी 15 ऑगस्टपूर्वी भरणारे हे धरण यंदा भरते की नाही अशी शंका व्यक्त केली जात होती. पण बाप्पा पाणलोटात जोरदार पाऊस घेऊन आल्याने आज हे धरण काठोकाठ भरत आहे. त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या रतनवाडीत गत दोन दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. गुरूवारी 156 मिमी तरशुक्रवारी 127 मिमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा, घाटघर, पांजरे आणि वाकीतही जोरदार पाऊस कोसळत आहे. भंडारदरात काल दिवसभर पडलेल्या पावसाची 25 मिमी नोंद झाली आहे. काल दिवसभरात 12 तासांत धरणात 236 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले.

वाकीचा ओव्हरफ्लो वाढला असून तो 789 क्युसेक असून निळवंडे धरणातही पाण्याची आवक वाढू लागल्याने या धरणातील पाणीसाठा फुगू लागला आहे.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा धरण पाणलोट क्षेत्रात काल शनिवारी सलग तिसर्‍या दिवशीही पावसाचा जोर टिकून आहे. दिवसभरात काही अंतराने पावसाच्या सरी कोसळत असल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे.

मुळा धरणाकडे पाण्याची आवक चांगली होत आहे. सकाळी मुळा धरणाकडे 7 हजार 342 क्युसेस आवक सुरू होती. त्यामुळे मुळा धरणाचा साठा 21 हजार 809 दशलक्ष घनफूट झाला आहे. येथून आज सायंकाळी सहा वाजता 4 हजार 429 क्युसेस चा विसर्ग मुळा धरणाकडे सुरू आहे. त्यामुळे आज सकाळपर्यंत पाणीसाठा 22000 दलघफूच्या पुढे सरकलेला असेल. पाण्याची आवक अशीच टिकून राहिली तर मुळा धरण येत्या काही दिवसात भरू शकते अशी आशा निर्माण झाली आहे

मुळा धरण भरण्याची आशा निर्माण झाल्याने लाभक्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे तर पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने भात पिकाला संजीवनी मिळाली आहे.

दरम्यान, कुकडी प्रकल्पातही पाण्याची आवक सुरू आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 386 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने या समूहातील एकूण पाणीसाठा 20041 दलघफू (68 टक्के) झाला आहे. या समूहातील सर्वाधिक क्षमता असलेल्या डिंभे धरणात 12450 दलघफू (92 टक्के) पाणीसाठा झाला आहे.

वादळासोबत पाऊस

बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्री वादळ 17-18 सप्टेंबरला राजस्थान व गुजरात-कच्छच्या भागात राहील. 19 कच्छवरुन ते पाकिस्तानच्या दिशेने जाईल. या काळात नाशिक भागातील हवेचा दाब या काळात 752 मीलीबार व चक्रीय वादळाचा दाब 738 च्या दरम्यान राहील. नाशिकपासून या चक्रीय वादळाचा केंद्रबिंदू जवळपास 700 किमी दूर असणार आहे. त्यामुळे नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात या चक्री वादळाचा अपेक्षित प्रभाव जाणवणार नाही. या वादळाने अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वार्‍यांमुळे काही प्रमाणात पाऊस पडेल. परंतु तो सर्वदुर न पडता स्थानिक स्वरुपाचा राहिल. उभ्या पिकांना याचा फायदा होईल पण भुजलपातळी तसेच धरणात समाधानकारक आवक होईल, असे जलसंपदाचे कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com