भंडारदरा धरणातून मुसळवाडी तलावात 
पाणी सोडले

भंडारदरा धरणातून मुसळवाडी तलावात पाणी सोडले

मुसळवाडी |वार्ताहर| Musalwadi

राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) पूर्वभागातील सुमारे पंधरा ते सोळा गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी जलसंजीवनी देणार्‍या मुसळवाडी तलावात (Musalwadi Pond) भंडारदरा धरणातून (Bhandardara Dam) कालव्याद्वारे 30 ते 40 क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, (Ganesh Nannor, Executive Engineer, Ahmednagar Irrigation Department) देवळाली प्रवरा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आर. एन. थोरे, मुसळवाडी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एस.बी. सुरूबकर, शाखाधिकारी जावेद सय्यद यांनी दिली. मुसळवाडी तलावाची (Musalwadi Pond) साठवण क्षमता सुमारे 189 दशलक्ष घनफूट असून आज अखेर पाणी पातळी 55 दशलक्ष घनफूट म्हणजेच तीस ते पस्तीस टक्के जलसाठा शिल्लक असून तलाव पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरून घेण्यात येणार असल्याचे शाखाधिकारी सुरूबकर व शाखाधिकारी सय्यद यांनी सांगितले.

मुसळवाडी तलावातून (Musalwadi Pond) मुसळवाडीसह टाकळीमिया, लाख, दरडगाव, जातप, त्रिंबकपूर, महाडूक सेंटर, मालुंजे खुर्द, महालगाव, माहेगाव, खुडसरगाव, पाथरे खुर्द, शेनवडगाव, कोपरे, बोरी फाटा, वांजुळपोई, तिळापूर, आदी गावाच्या पाणी योजना व शेती सिंचनासाठी पाण्याचा वापर केला जातो. मुसळवाडी तलाव पूर्ण क्षमतेने 100 टक्के भरण्याकडे लाभक्षेत्रातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.