भंडारदरा आज निम्मे होणार, मुळा धरण 40 टक्के भरले

कुकडीचा पाणीसाठा 22 टक्के
भंडारदरा आज निम्मे होणार, मुळा धरण 40 टक्के भरले
भंडारदरा परिसरात आषाढ सरींनी जोर धरल्याने पांजरा फॉल खळखळून वाहत आहे.

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान (Uttar Nagar district) ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात (Bhandardara dam Watershed) पावसाचा जोर (Rain) टिकून असल्याने नवीन पाण्याची आवक (New water inflow) होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा (Dam Water Storage) तासागणिक वाढू लागला आहे. गत 12 तासांत 192 दलघफू पाणी दाखल झाले. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 5275 दलघफू झाला आहे. पावसाचे प्रमाण असे टिकून राहिल्यास आज बुधवारी या धरणातील पाणीसाठा निम्म्यावर जाण्याची शक्यता आहे.

पाणलोटात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. तसेच पावसाचा जोर नसल्याने दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती. पण गत तीन दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात (Bhandardara dam Watershed) आषाढ सरींचा फेरा वाढला आहे. सह्याद्रीच्या रांगा धुक्याने लेपाटून गेल्या आहेत. जनजीवन गारठू लागल्याने कळसूबाई शिखर (Kalsubai peak) व अन्य ठिकाणी धुण्या पेटू लागल्या आहेत.

11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात मंगळवारी सायंकाळी 5275 दलघफू पाणीसाठा होता. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडेतही (Nilwande) नवीन पाणी येत असून काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 1500 दलघफू होता. 102 दलघफू क्षमतेचे वाकी तलावातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर पोहचला आहे.आढळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने या धरणात हळूवारपणे नवीन पाण्याची आवक होत आहे.

कोतूळ वार्ताहराने कळविले की, मुळा पाणलोटातही (Mula watershed) कोतूळ (Kotul), हरिश्चंद्र गड (Harishchandra Gad), आंबित (Ambit), पाचनईत (Pachnait) काल मंगळवारी दिवसभर संततधार सुरू होती. त्यामुळे मुळा नदीतील (Mula River) पाणीपातळी सकाळी 3212 क्युसेक होती. दुपारनंतर त्यात वाढ होत 5000 क्युसेकच्या पुढे गेली होती. मात्र धरणात पाणी येण्यास उशीर लागत असल्याने सायंकाळी धरणात 2568 क्युसेकने आवक सुरू होती. रात्रीतून ही आवक वाढेल असे सांगण्यात आले. पाऊस सुरू असल्याने भात आवणीने वेग घेतला आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात काल सायंकाळी 10401 दलघफू पाणीसाठा होता.

कुकडीचा पाणीसाठा 22 टक्के, डिंभे 40 टक्के पाणीसाठा

नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाचही धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. या प्रकल्पात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 899 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे एकूण उपयुक्त पाणीसाठा 6520 दलघफूवर(22 टक्के) पोहचला होता. याचवेळी गतवर्षी 20 टक्के पाणीसाठा होता.( सर्वात मोठे असलेल्या डिंभे धरणात 492 दलघफू पाणी दाखल झाल्याने साठा 4810 दलघफू (40 टक्के) झाला आहे. येडगाव धरणात 1397, माणिकडोह 2122, वडजमध्ये 593 दलघफू पाणीसाठा आहे. घोड धरणातील पाणीसाठा 1548 दलघफू आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com