भंडारदराचे आवर्तन सोडण्याच्या ना. विखेंच्या जलसंपदाला सूचना

File Photo
File Photo

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

लांबलेला पाऊस (Rain) आणि उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून भंडारदरा धरणातून (Bhandardara Dam) शेती आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन (Drinking Water Rotation) रविवारी संध्याकाळपासूनच सोडण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या.

File Photo
राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचे भाव

भंडादारा धरणात (Bhandardara Dam) पाण्याची उपलब्धता आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यास त्यांनी जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) अधिकार्‍यांना सांगितले.

File Photo
दोन कंटेनरच्या अपघातात चालक ठार

यावर्षी पाऊस लांबल्याने लाभक्षेत्रातील काही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई (Drinking Water Scarcity) मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. शेती पिकांसाठी पाण्याची तीव्रता भेडसावू लागल्याने शेतकर्‍यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी अधिकार्‍यासमवेत चर्चा केली. या आवर्तनाचा (Rotation) मोठा दिलासा शेतकरी आणि नागरिकांना मिळणार आहे.

File Photo
श्रीरामपूरकरांची ‘कडकडीत’ एकजूट!

त्यानुसार प्रवरेच्या लाभक्षेत्रात आवर्तनाचे नियोजन केले जाणार असून आवर्तनाच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे.

File Photo
आता बैलांचे वेदनामुक्त खच्चीकरण!
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com