भंडारदरा कालवा समितीची गुरूवारी बैठक

भंडारदरा (File Photo)
भंडारदरा (File Photo)

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण रब्बी हंगाम 2023-24 च्या आवर्तन नियोजनाबाबत गुरूवार दि. 16 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12 वाजता महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीस प्रवरा कालवे सल्लागार समितीचे सदस्य तसेच पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित रहाणार आहेत.

यंदा लाभक्षेत्रात पाऊस कमी पडल्याने रब्बीचे दोन व उन्हाळी आवर्तने देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात सध्या 10055 दलघफू (91.09) टक्के पाणी आहे. तसेच निळवंडेत समाधानकारक पाणीसाठा आहे. त्यामुळे योग्य नियोजन केल्यास पिण्याचे पाणी वगळता रब्बीची दोन व उन्हाळी आवर्तन देणे शक्य असल्याचे मत तज्ञ आणि अभ्यासू शेतकरी करीत आहेत. त्यामुळे या बैठकीत किती आवर्तनाचा निर्णय होतो. याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com