‘धिंगाणा घालणार्‍या ‘त्या’ पाच पर्यटकांना पोलीस कोठडी

पोलीस व स्थानिक ग्रामस्थांना केली होती मारहाण
‘धिंगाणा घालणार्‍या ‘त्या’ पाच पर्यटकांना पोलीस कोठडी

अकोले |प्रतिनिधी| Akole

भंडारदरा परिसरात (Bhandardara area) शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता मद्य धुंदीत असलेल्या सैन्य दलातील दोघे (Two army person drunk) व इतर तिघे असे पाच व्यक्तींनी धिंगाणा घालून ग्रामस्थ व पोलिसांना मारहाण (Police Beating) केल्याने वातावरण संतप्त झाले. भंडारदरा ग्रामस्थ (Bhandardara villagers) व पोलिसांनी (Police) एकत्र येत त्यांच्या मुसक्या आवळून राजूर पोलीस ठाण्यात (Rajur Police Station) त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

भंडारदरा धरणामध्ये एक पर्यटक बुडाल्याची खबर राजूर पोलिसांना लागली असता ते सायंकाळी 5 वाजता घटनास्थळी दाखल झाले मात्र बुडालेल्या पर्यटकाचा शोध न लागल्याने ते परतत असताना काही पर्यटकाची दारूच्या नशेत पोलिसांना दमबाजी व शिविगाळ करत होते. ही बाब स्थानिक व्यावसायिक प्रकाश खाडे यांच्या लक्षात आली. ते मध्यस्ती करत असताना या पर्यटकांनी प्रकाश खाडे याला जबर मारहाण केली.

तसेच पोलिसांनाही शिविगाळ केली. आम्ही कायदा मानत नाही, आम्ही आर्मीमध्ये (Army) आहोत, तुम्हाला काय करायचे ते करा, तुमच्या नोकर्‍याच घालवतो असा दम देत पोलिसांचे शर्ट पकडून त्यांच्या अंगावर हात टाकला. स्थानिक रहिवाशांनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्या पर्यटकाना चांगलाच चोप दिला. त्यांना राजूर पोलिस ठाण्यात (Rajur Police Station) आणण्यात आले.

हे मद्यपी वडगाव लांडगा, वाघापूर, हिवरगाव आंबरे येथील असून त्यतील दोघे जण काळे व औटी हे सैन्यदलात आहेत असे त्यांचे सोबत असलेले ज्ञानेश्वर लांडगे यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com