भंडारदरा परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह वाहन चालक अटकेत

भंडारदरा परिसरात अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह वाहन चालक अटकेत

अकोले |प्रतिनिधी| Akole

भंडारदरा परिसरात (Bhandardara) अवैध दारू (Illegal alcohol) वाहतूक करणाऱ्या वाहनासह वाहन चालक रमेश रामचंद्र अस्वले यास राजूर पोलिस स्टेशनचे (Rajur Police station) सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे (PI Narendra Sabale) यांनी वाहन व दारू असे 2 लाख 14 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. भंडारदरा परिसरात एक महिंद्रा मॅक्स कंपनीची गाडी अवैध दारू अवैध दारू वाहतूक करणार असल्याची माहिती सपोनि नरेंद्र साबळे यांना मिळाली.

त्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी यांनी घाटघर फाटा, शेंडी, भंडारदरा येथे नाकेबंदी (Blockade at Shendi, Bhandardara) केली. त्यावेळी महिंद्रा मॅक्स कंपनीची गाडी नंबर एम.एच.09 एस 9482 हे वाहन दिसून येताच त्या वाहनाची तपासणी केली असता त्या वाहना मध्ये दारू असलेल्या 8640 रुपये किमतींची बॉबी संत्रा कंपणीच्या 144 सीलबंद बाटल्या व 6000 रुपये किमतीच्या बॉबी संत्रा कंपनीच्या 200 सीलबंद बाटल्या असा मुद्देमाल मिळून आला.वाहतूक करणाऱ्या चालकाकडे चौकशी (Inquiry to the driver) केली असता त्याने त्याचे नाव रमेश रामचंद्र अस्वले रा.मुरशेत ता.अकोले असे नाव सांगून नमूद मुद्देमाल विना परवाना विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले.

त्या चालकास वाहनासह ताब्यात घेऊन राजूर पोलीस स्टेशनमध्ये (Rajur Police Station) गु.र.नंबर 101/ 2021 मु पो ऍक्ट कलम 65 (अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक विजयS मुंढे करीत आहे. सदरची कारवाई सपोनि नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन खैरनार, पोलिस नाईक विजय मुंढे, पोलीस कॉन्स्टेबलअशोक गाडे, दिलीप डगळे, पांडूरंग पटेकर यांनी केली. अवैध दारू विक्री (Illegal sale of alcohol), वाहतूक करणारे, ठिकाणे याबाबत माहिती असल्यास राजूर पोलीस स्टेशन ला कळवावी, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन सपोनि नरेंद्र साबळे यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com