सोनई l वार्ताहर

देश-विदेशात लौकिक असलेल्या शनी शिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची सर्वानुमते निवड झाली आहे.

कोषाध्यक्षपदी दीपक दरंदले, सरचिटणीस बाळासाहेब बोरुडे, चिटणीसपदी आप्पासाहेब शेटे यांची निवड झाली. नूतन पदाधिकाऱ्यांचे राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले.

शनी शिंगणापूर येथे श्री शनैश्वर देवस्थानच्या सभागृहात शुक्रवार (ता. ८) रोजी सकाळी दहा वाजता नवनियुक्त विश्वस्तांची नूतन पदाधिकारी निवडीसाठी बैठक पार पडली. त्यात वरील पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदाच्या नावाची सूचना आप्पासाहेब शेटे यांनी केली तर अनुमोदन विकास बानकर यांनी दिले .

श्री शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांच्या निवडी (ता. २३) डिसेंबर रोजी जाहीर झाल्या होत्या. नूतन पदाधिकारी निवड बैठकीस बाळासाहेब बोरुडे, विकास बानकर, छबुराव भूतकर, पोपट कुर्हाट, शहाराम दरंदले, भागवत बानकर, सुनीता आढाव, दीपक दरंदले, शिवाजी दरंदले, पोपट रामचंद्र शेटे, आप्पासाहेब शेटे या विश्वस्तांसह देवस्थानचे सह कार्यकारी अधिकारी गोरक दरंदले उपस्थित होते.