पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

पिस्तुलाचा धाक दाखवून कर्मचार्‍यास लुटले
पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
Pudhari

साकुर |वार्ताहर| Sakur

संगमनेर (Sangamner) तालुक्यातील साकुर (Sakur) येथील साकूर-मांडवा रोडवरील (Sakur Mandava Road) भगवान पेट्रोल पंपावर (Bhagwan Petrol Pump) पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या अज्ञात तीन दरोडेखोरांनी (Robber) पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यास पिस्तुलाचा धाक (Fear Pistol) दाखवुन 2 लाख 50 हजार 747 रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
गायकर, घुले, जगताप यांच्यात रस्सीखेच ?

साकूर-मांडवे रोडवर भगवान पेट्रोल पंपावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले 3 अज्ञात दरोडेखोर (Robber) मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले होते. त्यावेळी पंपावरील कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे हा पेट्रोल (Petrol) भरण्यासाठी पंपाकडे जात असताना ते तिघे अज्ञात दरोडेखोर (Robber) केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तुलाचा धाक (Fear Pistol) दाखवत तुझ्याकडे असणारे सर्व पैसे आम्हाला दे नाही, तर गोळी घालून मारून टाकण्याची धमकी (Threat) दिली.

पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
गोदावरीचे दोन्ही कालवे आज वाहते होणार

तर दुसर्‍याने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले, तर तिसर्‍याने ड्राव्हरमध्ये असलेली काळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पैसे काढून घेतले आणि मांडवे गावच्या दिशेने पळून गेले. पंपावरील कर्मचारी चोर चोर असे मोठ्याने ओरडल्यामुळे आसपासचे नागरिक पंपाकडे धावले, तर गिरे यांनी या घटनेची माहिती पंपाचे मालक आदिक खेमनर आणि मॅनेजर दत्ता शेंडगे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
डॉ. शेखर यांच्या पोलीस पथकांचे नगर शहरात छापे गॅस रिफिलिंग
पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा
शेवगावच्या 105 आदिवासी विद्यार्थ्यांनी मध्यरात्री धरली नाशिकची वाट
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com