माजी सभापती मुरूमकरांच्या अडचणीत वाढ

खंडणीसह खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
माजी सभापती मुरूमकरांच्या अडचणीत वाढ

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जामखेड पोलीसांनी माजी पंचायत समिती सभापती भगवान मुरूमकरांसह आठ जणांवर खुनाचा प्रयत्न करणे असा वाढीव गुन्हा दाखल केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जामखेड येथील सागर अंदुरे कुटूंबियांना खंडणी व मारहाण प्रकरणी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्या सह एकुण आठ जणांवर खंडणीसह आता खुनाचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल झाला आहे. जामखेड येथील प्रसिध्द व्यावसायिक अंदुरे कुटूंबाकडे 50 लाखांची खंडणी मागत सतत धमकावणे व मारहाण केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांचेसह 8 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे जामखेडच्या राजकिय व व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.

या घटनेतील फिर्यादी सागर अंदुरे व दोन नातेवाईक या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. त्या मुळे त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत जखमींच्या मेडिकल अहवाला नुसार पुन्हा या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न करणे हे वाढीव कलम लावण्यात आले आहे असल्याची माहिती या गुन्हाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी दिली आहे.

पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य डॉ. भगवान मुरुमकर यांनी दोन दिवसांपुर्वीच पत्रकार परिषद घेत आपला यात सहभाग नसल्याचा दावा केला होता. परंतु दोन दिवसांतच त्यांच्या सह आठ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे हे वाढीव कलमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने जामखेड तालुक्यातील राजकीय व व्यवसाईक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com