हनीट्रॅपपासून सावध रहा

अखिल भारतीय चित्रपट मंडळाचे समन्वयक नजान यांचे आवाहन
हनीट्रॅपपासून सावध रहा

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar - सोशल मीडियाच्या माध्यमातून होणार्‍या हनीट्रॅप (honey trap) पासून नाट्य, चित्रपट, सांस्कृतिक क्षेत्रातील तसेच समाजातील प्रतिष्ठित, तरूण वर्गाने सावध राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे जिल्हा मुख्य समन्वयक शशिकांत नजान (Shashikant Najan) यांनी केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोळखी महिला मैत्री करून नंतर अश्‍लील मेसेजद्वारे समोरच्या व्यक्तीला भुरळ पाडून त्याच्याशी केलेल्या मेसेज आणि अश्‍लील व्हिडीओ संवादाचा वापर ब्लॅकमेल करण्यासाठी करते. बदनामीच्या भीतीपोटी बळी पडून अनेकांनी लाखो रुपये दिले आहेत. सदर प्रकार हा सेक्सटोरेशनचा असून कोणीही अनोळखी महिलेशी मैत्री करताना सावधान राहावे असेही नजान यांनी सांगितले.

अनेकांना उत्सुकतेपोटी या प्रकारचा चांगलाच मनस्ताप झाला असून काही तरुण आत्महत्या करावी या विचारपर्यंत देखील गेले आहेत. त्यांना वेळीच परिवाराने आणि मित्रांनी धीर दिल्यामुळे अनर्थ टळले आहेत. जे कोणी सेक्सटोरेशनला बळी पडले आहेत, त्यांनी न घाबरता सायबर पोलीस ठाण्यात संबधितांविरोधात तक्रार दाखल करावी, असे आवाहन नजान यांनी केले आहे. या सेक्सटोरेशनमुळे संकटात आले असतील त्यांनी कोणतीही भीती न बाळगता तक्रार देण्यासाठी पुढे यावे, त्यांना कायदेशीर मदत करण्याची तयारी अ‍ॅड. शिवाजी कराळे, हरजीतसिंह वधवा, श्रेणीक शिंगवी, संदीप भांबरकर, अनंत रिसे, विराज मुनोत, प्रशांत जठार, स्वप्नील नजान यांनी व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com