खरेदीला जाणार्‍या महिलांनी दागिन्यांची काळजी घ्यावी

नगरमध्ये पोलिसांचे आवाहन : सोनसाखळी चोरट्यांपासून सावधान
खरेदीला जाणार्‍या महिलांनी दागिन्यांची काळजी घ्यावी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सावेडी (Savedi) उपनगरात सोनसाखळी (Gold chain theft) चोरीच्या घटना नेहमी घडत असतात. करोनाचा प्रादुर्भाव (Covid 19) कमी झाल्याने सर्व आस्थापना खुल्या झाल्या आहेत. नवरात्र उत्सव (Navratra Celebrations) व दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात महिला घराबाहेर पडत असून महिलांनी सोन्याची दागिने (Gold jewelry) घालावेत परंतु, चोरट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Police Station) पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी (Police Inspector Jyoti Gadkari) यांनी केले आहे.

उच्चभ्रू लोकांची वसाहत म्हणून सावेडी (Savedi) उपनगराची ओळख आहे. या परिसरात चोर्‍या (Theft), घरफोड्यांबरोबरच (Burglary) मोठ्या प्रमाणात सोनसाखळी चोरीच्या (Gold chain Theft) घटना घडत असतात. गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड परिसरातून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना नेहमी घडतात. विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांकडून महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबडून धूम ठोकली जाते. वारंवार घडणार्‍या घटनांमुळे महिलावर्गात भितीचे वातावरण आहे.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. दोन दिवसांमध्ये नवरात्र उत्सव सुरू होत आहे. तसेच महिनाभरात दिवाळी सण आला आहे. यामुळे महिलांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे. याचा फायदा चोरट्यांकडून घेतला जाण्याची शक्यता असून महिलांनी सोन्याचे दागिने घालून खरेदीसाठी गेल्यास सावधानता बाळगावी, असे आवाहन निरीक्षक गडकरी (Police Inspector Jyoti Gadkari) यांनी केले आहे.

तोफखाना पोलिसांकडून उपाययोजना

सण-उत्सवाचे दिवस असल्याने सोनसाखळी, पर्स चोरीच्या घटना घडू नये यासाठी तोफखाना पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सावेडी उपनगरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून विनानंबर दुचाकी व संशयित दुचाकीस्वारांची तपासणी केली जात आहे. तोफखाना हद्दीत दुचाकी, चारचाकी वाहनातून दिवस-रात्र गस्तीचे नियोजन केले आहे.

खरेदीसाठी, देवदर्शनासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांनी संशयित व अनोळखी इसमांपासून सावध राहावे, दुचाकीवरून आलेल्या अनोळखी इसमांनी पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती विचारण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याशी बोलणे टाळावे, सोन्याची दागीने, हातातील पर्सची महिलांनी काळजी घ्यावी. सोनसाखळी, चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत.

- ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक, तोफखाना

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com