बेलवंडीत दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच

पतसंस्थेतील प्रयत्न फसला, ग्रामस्थांचा 3 तास रास्ता रोका
बेलवंडीत दुकाने फोडण्याचे सत्र सुरूच

बेलवंडी |वार्ताहर| Belwandi

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणारे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे 3 च्या सुमारास फोडले. तर सायरन वाजल्याने पतसंस्थेतील चोरीचा प्रयत्न फसला. बेलवंडीत चोर्‍यांचे सत्र सुरूच असून यामुळे संतापलेल्या ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांनी सुमारे तीन तास रस्तारोको आंदोलन केले.

या प्रकरणी निलेश ईधाटे यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी किरणा दुकान व जवळील पतसंस्था फोडली. पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणार्‍या ठिकाणी चोरी झाल्याने संतप्त झाले.

बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत मोठया प्रमाणात चोर्‍याचे प्रमाण वाढले आहे. मागील महिन्यात बसस्थानाक परिसरात अशाच प्रकारे चोरट्यानी एक रात्रीत 7 दुकाने आणि 3 घरफोडी करत धुमाकूळ घातला होता. हायटेक चोरी करून चोर बेलवंडी पोलिसांना आवाहन देत आहेत. तर पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले आहेत. पहाटे झालेल्या चोरीने संतप्त व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेऊन मुख्य रोडवर रास्तारोको करत पोलीस यंत्रणेचा निषेध केला.

यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, श्रीगोंदा कारखाण्याचे माजी व्हा. चेअरमन ज्ञानदेव हिरवे,खरेदी विक्री संघाचे संचालक सुभाष काळाने, उपसरपंच उत्तम डाके,नागवडे कारखान्याचे संचालक सावता हिरवे, तंटामुक्ती चे अध्यक्ष संग्राम पवार, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक मधुकर शेलार, संजय डाके, एकनाथ पवार, अशोक शेलार,युवा नेते ऋषिकेश शेलार,दिलीप लबडे,यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.

बेलवंडी परिसरात मागील महिन्यात एकाच रात्री 10 दुकाने चोरट्यानी फोडली होती. तरी पोलिसांना चोर पकडता आले नाही. फक्त बेलवंडी मध्येच चोरी करणारे चोर पोलिसांना का सापडत नाही यावर पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या कामगिरी वर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.पोलिसांनी बेलवंडी करांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा व्यापारी व ग्रामस्थांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

- अण्णासाहेब शेलार, मा. उपाध्यक्ष, जि. प.अहमदनगर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com