
बेलवंडी |वर्ताहर| Belwandi
जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी करून कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यादरम्यान तीन दुचाकी टाकून चोरट्यांनी पळ काढल्याचा प्रकार घडला. पोलीसांनी दीड लाखांच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.
बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नंदकुमार दुधाळ यांनी कोम्बिंग ऑपरेन दरम्यान अवैध धंदया बाबत माहिती घेतली. रेकॉर्डवरील पाहिजे फरारी आरोपी पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली. काही चोरट्यांबाबत गुप्त माहिती मिळाल्याने तात्काळ नाकाबंदी केली. दरत्मान बजाज कंपनीची पल्ेसर मोटार सायकल नंबर (एमएच 12 एम.टी. 7397), हिरो कंपनी स्पेलडर मोटारसायकल नंबर (आर.जे.09 एन.एस 7517),होंडा कंपनीची कंपनीची मोटारसायकल नंबर (एम.एच 12 क्यु.ओ.5543) असे नाकाबंदी चालू असल्याचे पाहुन संशयितांंनी मोटारसायकल टाकून पळ काढला. पोलीसांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. सदर मोटारसायकल या निगडी पोलीस ठाणे,कोंढवा पोलीस ठाणे जिल्हा पुणे येथील पोलीस स्टेशन हद्दीतील आहेत.