बेलवंडीच्या अवैध व्यवसायाबाबत नवीन पीआय यांच्या भूमिकेकडे लक्ष

तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश
बेलवंडीच्या अवैध व्यवसायाबाबत नवीन पीआय यांच्या भूमिकेकडे लक्ष

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील अवैध व्यावसायिकांना चाप बसवण्यासाठी खमक्या पोलीस अधिकार्‍यांची गरज आहे. तालुक्यातील पोलीसांचा गुन्हेगारी वर वचक नसल्याने दारूच्या भट्ट्या, जुगाराचे अड्डे, अवैध देशी, विदेशी मद्य आणि सोबतच गुटख्याची साखळी तोडण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांना यश आलेले नाही. श्रीगोंदा पोलीस ठाणे आणि बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत हे अवैध व्यवसाय तेजीत आहेत. बेलवंडीला नव्याने आलेले पोलीस निरीक्षक त्यांच्या हद्दीत अवैध व्यवसायाबाबत काय ठोस भूमिका घेतात का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

श्रीगोंदा शहरातील कॉलेज रस्त्यावर मोकाट गाड्या फिरवत असलेले तरुण टोळ्या बनवनू रोज वाढ घालत आहेत. तर अनधिकृत कॅफे, गुटख्याच्या टपर्‍या यात मावा, गोवा आणि अनधिकृत मटक्याच्या धंदा यावर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. श्रीगोंदा तालूका तसा सधन असला तरी मटका, जुगाराच्या फेर्‍यात तालुक्यातील तरूणाई अडकत असून भपकेबाजपणाच्या नादात तरुण अडकले असल्याने तालुक्यातील सर्वच अवैध व्यवसायाच्या विरोधात खमकी भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्यात अवैध व्यवसायाला भरभराटीचे दिवस आले असून दारू, जुगार, मटका या व्यवसायाला आळा घालताना व्याजाने पैसे देणारे ठराविक मंडळी असून त्यांच्या विरोधात आता निर्णायक कारवाई करण्याची वेळ आली आहे.

मटक्याच्या धंद्याला राजकीय आशिर्वाद ?

तालुक्यात मटका खेळणारा मोठा वर्ग आहे. कुणी टपरीवर जावून पावत्या फाडतात, तर काही बडे उद्योगी मोबाईलवर खेळ देतात. पण हे मटका टपर्‍या, बुकी ज्यांच्या आहेत. त्यातील बहुतांशी जण राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने या अवैध व्यवसायाला राजकीय आशिर्वाद असल्याचे दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com