बेलपिंपळगावात लक्ष्मीमाता यात्रा उत्साहात

बेलपिंपळगावात लक्ष्मीमाता यात्रा उत्साहात

बेलपिंपळगाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील सालाबादप्रमाणे श्री लक्ष्मी माता मंदिरात गुरुपौर्णिमेच्या नंतर येणार्‍या मंगळवारी देवीची यात्रा पार पडली.

सकाळी गोदावरी नदीच्या पवित्र जलाने देवीला स्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत देवीला अभिषेक करण्यात आला. सकाळी 10 वाजल्या पासून या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. संपूर्ण आषाढ महिन्यात मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात. यात्रा निमित्ताने हजारो भाविकांची गर्दी बघायला मिळाली.

सायंकाळी 5 वाजता देवीच्या रथाची गावातून वाजतगाजत, फटाक्यांची आतषबाजीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. पोलीस पाटील संजय साठे यांच्या हस्ते रथाचे पूजन करण्यात आले त्यानंतर लक्ष्मीवाडी येथील देवीच्या मंदिरात देखील होम हवन पूजन करून देवीचा जागर करण्यात आला. यावेळी अनेकांनी देवीचा महिमा सांगितला तसेच मोठ्या संख्येने देवीचे पोतराज या मिरवणुकीत सहभागी झाले होते त्यांनी देवीचा जागर केला.

रात्री 8 वाजता मंदिरात भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील सरपंच पती चंद्रशेखर गटकळ, सुभाष शेंडगे, राजेंद्र साठे, भीमजी साठे, कृष्णा शिंदे, किरण शिंदे, कल्याण शिंदे, संदीप गटकळ, संदीप कोकणे, महेंद्र साठे, चंद्रकांत सरोदे, योगेश कांगुणे, गणेश कोकणे, अशोक कनगरे, बाळासाहेब शेंडगे, भावराव कनगरे, रघुनाथ कनगरे, कॉन्स्टेबल बाळासाहेब कनगरे, गणेश धानापुणे, बबन कनगरे, संतोष कनगरे, गणेश कनगरे, बाळासाहेब कनगरे, अनिल साठे, आकाश कनगरे, दीपक बागुल, महेश बागुल, सचिन कनगरे, संतोष आडगळे, वसंत कनगरे, कचरू कनगरे, साळू कनगरे तसेच लक्ष्मीमाता मित्र मंडळ, लहुजी सेना तसेच विराट प्रतिष्ठान व शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते यांनी योगदान दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com