बेलपिंपळगाव येथील पशुप्रदर्शनास प्रतिसाद

बेलपिंपळगाव येथील पशुप्रदर्शनास प्रतिसाद

बेलपिंपळग़ाव |वार्ताहर| Belpimpalgav

नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योजना प्रसिद्धी व प्रचार अंतर्गत आयोजित पशुप्रदर्शन कार्यक्रमास चांगला प्रतिसाद लाभला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक नाथा तागड होेते.

यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या आदी जनावरांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. तसेच सहभागी प्रत्येकाला रोख स्वरुपात बक्षीसांचे वाटप करण्यात आले.

नेवासा तालुक्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख तसेच जिल्हा परिषदेचे अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांमुळे अमुलाग्र बदल होत आहे. याचा पशुपालकांना अभिमान आहे. या कार्यक्रमासाठी डॉ. के. डी. नजन, डॉ. भाऊसाहेब डौले, डॉ. तेजस घुले, डॉ. दिनेश पंडुरे, डॉ. आर. एस. पिटेकर, डॉ. अमोल गायकवाड, डॉ. जी. एम. वीर, डॉ. ए. आर. मापारी, डॉ. बी. ए. दहिफळे, सरपंचपदी चंद्रशेखर गटकळ, चेअरमन राजेंद्र गायकवाड, बाबासाहेब भांड, सखाराम कांगुणे, बाबासाहेब कोकणे, पंचायत समिती सदस्य रवींद्र शेरकर, संचालक अमोल कोकणे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com