बेल्हेकरवाडी येथे बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

बेल्हेकरवाडी येथे बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई (Sonai) जवळील बेल्हेकरवाडी (Belhekarwadi) शिवारातील बेल्हेकरवस्ती येथे काल शनिवारी रात्री बिबट्याने (Leopard) एका शेळीचा फडशा पाडला असून अनेकांच्या नजरेत बिबट्या (Leopard) पडला असल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की बेल्हेकरवाडी येथील शेतकरी जनार्दन सूर्यभान बेल्हेकर यांच्या वस्तीवर शेतीच्या बाजूने असलेल्या पाच फूट उचींच्या भिंतीवरून उडी मारत रात्री दोन वाजेच्या दरम्यान बिबट्याने (Leopard) शेळीवर हल्ला (Goat attack) करून शेळीचा फडशा पाडला. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वन विभागाच्या कर्मचार्‍यांना याबाबत कळविण्यात आले.

वन विभागाचे कर्मचारी श्री. डेरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तीन दिवसांपूर्वीही या परीसरात एक कालवड ठार झाली होती. बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ पिंजरा लावावा,अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com