बेलापुरातील तरुणाची आत्महत्या

बेलापुरातील तरुणाची आत्महत्या

बेलापूर |वार्ताहर| Belapur

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील तरुणाने काल त्याच्या राहत्या घरी पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बेलापूर येथील पाहुणेनगर भागात राहणारा गजानन (पिनू) नाना वायदंडे (वय 35) या तरुणाने किरकोळ कारणावरुन राहत्या घरी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पंख्याला गळफास घेवुन जिवनयात्रा संपवली.

त्याच सुमारास त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी बेलापूर पोलिसांंना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला व गजानन वायदंडे यास रुग्णालयात दाखल केले मात्र त्यापूर्वीच तो मयत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. त्यानंतर शवविच्छेदन करुन त्याचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकार्‍यानी दिलेल्या अहवालावरुन शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे हे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com