श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बेलापूर बुद्रुक येथील अनधिकृत बिनशेती वापर व विना परवानगी बांधकामांची तपासणी करण्यात येऊन कारवाई

करण्याबाबतचे आदेश प्रांताधिकार्यांनी दिल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

बेलापूर बुद्रुकमध्ये अनेकांनी अनधिकृत बिनशेती वापर व विना परवानगी बांधकामे केल्याचे निदर्शनास आले आहे. काल बेलापूर गाव ते श्रीरामपूर रोडवरील रसवंती पर्यंतच्या सर्व अनधिकृत बांधकामांची प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी पहाणी केली.

याप्रसंगी तलाठी कैलास खाडे व मंडल अधिकारी गोसावी भाऊसाहेब उपस्थित होते. अशी सर्व प्रकरणे तपासून कार्यवाही करणेबाबत कडक आदेश या अधिकार्यांनी यावेळी दिले आहेत.