बांधकाम साहित्य टाकण्याच्या कारणावरून बेलापुरात दोन कुटुंबांत हाणामार्‍या

बांधकाम साहित्य टाकण्याच्या कारणावरून बेलापुरात दोन कुटुंबांत हाणामार्‍या

बेलापूर |वार्ताहर| Belapur

आपल्या जागेत टाकलेले बांधकाम साहित्य उचलून घ्या, असे म्हटल्याचा राग आल्याने खटकळी येथे दोन कुटुंबात हाणामार्‍या होऊन परस्पर विरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. याबाबत अरुण बाळू धीरोडे याने फिर्याद दिली असून त्यात त्याने वडील बाळू धीरोडे यांनी आपल्या जागेत बांधकाम साहित्य टाकू नका असे म्हटल्याचा राग आल्याने पाच जणांनी घरात घुसून शिवीगाळ करीत मारहाण केली.

तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. आई परिघाबाई धीरोडे यांनाही दुखापत झाली आहे. त्यानुसार निलेश शेलार, दिनेश शेलार, योगेश शेलार, पप्पू खरात, मनीषा दिनेश शेलार यांच्या विरोधात श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा रजिस्टर नं.400 नुसार भादवी कलम 452,323,504,506,143,147 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्याविरोधात दिनेश भागवत शेलार या तरुणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसून तुम्ही आमच्या जागेत टाकलेले बांधकाम साहित्य काउचलले नाही?असे म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व धमकी दिली.

त्यावरून आरोपी सुनील बाळू धीरोडे, सुनील भानुदास गांगुर्डे, अरुण बाळू धीरोडे, दिलीप मोहन निकम, मंगल पवार, मंदा दिलीप निकम यांच्याविरोधात भादंवी कलम 452, 323, 143, 147, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. अतुल लोटके, पो. ना. रामेश्वर ढोकणे या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com