बेलापुरात टोकन पध्दत डावलून लसीकरण

स्थानिक नागरिकांना अंधारात ठेवल्याने संताप
बेलापुरात टोकन पध्दत डावलून लसीकरण

बेलापूर |वार्ताहर| Belapur

येथील प्राथमिक केंद्रातील अधिकार्‍यांच्या गलथान (primary center officers system) पध्दती तसेच लस उपलब्ध नसल्याचे आधी जाहीर करून ऐनवेळी टोकन पध्दत (Token system) डावलून ठराविक लोकांना फोन करून बोलावून घेत लसीकरण (vaccination) सुरू केल्याने लसीकरणाचा बोजवारा उडाला.

बेलापूर (Belapur) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health center) लस उपलब्ध नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे आरोग्य केंद्राने जाहीर केले होते. त्यामुळे ग्रामस्थ लसीकरण केंद्राकडे फिरकले नाही. तथापि, प्रत्यक्षात प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकार्‍यांनी लस आल्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना अंधारात ठेवून परस्पर ठराविक लोकांना फोन करून बोलावून लसीकरण सुरू केले.

याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, (ZP Member Sharad Navale) सुनील मुथा, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, माजी सरपंच भरत साळुंके, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, भाऊ डाकले, विशाल आंबेकर आदी केंद्रावर पोहचले. त्यांनी तुम्ही टोकन पध्दती बदलून परस्पर आपल्या मर्जीने ग्रामस्थांना अंधारात ठेवून लसीकरण सुरू का केले याबाबत जाब विचारला. श्री. मुथा व अधिकार्‍यांत वाद झाले. श्री. नवले, साळवी, खंडागळे यांनीही याबाबत आक्षेप घेतला. असे असेल तर तुमच्याच पध्दतीने लसीकरण करा, असे ते म्हणाले. अधिकार्‍यांनी झाल्या प्रकाराबाद्दल माफी मागितली. त्यानंतर लसीकरण सुरू झाले.

प्राथमिक केंद्राच्या अधिकार्‍यांनी लसीकरणाबाबत जाणिवपूर्वक घोळ केला. आधी लस नाही असे सांगून ऐनवेळी ठराविक लोकांना लसीकरणासाठी बोलावणे संशयास्पद आहे. आरोग्य केंद्रातील काही व्यक्ती पैसे घेऊन लसीकरण करतात, असा आरोप सुनील मुथा यांनी यावेळी केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com