बेलापूरच्या प्रवरा नदीत शेतकर्‍याची उडी

शोध कार्य सुरु
बेलापूरच्या प्रवरा नदीत शेतकर्‍याची उडी

बेलापूर |प्रतिनिधी|Belapur

काल सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास बेलापूर येथील प्रवरा नदीच्या पुलावरून बेलापूर खुर्द येथील एका तरुण शेतकर्‍याने उडी मारली. काल सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही.

काल मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे बेलापूरच्या प्रवरानदीच्या पुलावरून वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ सुरू होती. अशावेळी बेलापूर खुर्द येथील राजेंद्र तुकाराम बारहाते या शेतकर्‍याने नदीच्या पुलाच्या कठडयावर येवून उभे राहून थोडया वेळाने इकडे तिकडे पहात कठडयावर उभे राहून त्याने थेट प्रवरा नदीत उडी मारली. काहींनी त्याला कठडेवर उभे राहिला असल्याचे पाहताच हाक मारण्याचा प्रयत्न केला; परंतु, काही क्षणात त्याने नदीच्या पाण्यात उडी घेतली. नदीला भरमसाठ पाणी असल्याने तो क्षणार्थात नाहिसा झाला.

प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी आरडाओरड करत त्याला पहातच राहिले परंतु पाण्यात गेल्यानंतर तो कोणाच्याही दृष्टीस पडला नाही. तेथे असलेल्या काही नागरिकांनी तातडीने लगेच बेलापूर औटपोस्टचे पोलीस हवालदार अतुल लोटके, श्री. भिंगारदे, श्री. पानसंबळ यांना मोबाईलवरून ही माहिती दिली. पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, श्री भिंगारदे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

पट्टीच्या पोहणार्‍यांना तातडीने बोलावून शोध कार्य सुरु केले. त्यांच्या मागे दोन मुलं व एक पत्नी आहे.त्यांचे साधारण (वय 45) वर्षे असून पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक भिंगारदे व त्यांचे सहकारी तसेच पाण्यामध्ये पोहून शोध घेणारी टीम सदर इसमाचा शोध घेत आहेत. बेलापूर खुर्द व परिसरात राजेंद्र बारहाते याने नदीत उडी मारल्याची माहिती पसरताच नदी काठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

राजेंद्र बारहाते याने नदीत उडी मारुन जीवन संपविण्याचा प्रयत्न का केला याचे कारण मात्र समजू शकले नाही. काल रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. नदीला पाणी भरपूर असल्याने त्याच्यात अंधार झाल्याने मदत कार्य थांबविले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com