...तर बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी लक्ष घालणार

रेल्वे राज्यमंत्री ना. दानवे यांची शिष्टमंडळाला ग्वाही
...तर बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी लक्ष घालणार

कुकाणा |वार्ताहर| Kukana

शंभर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेलापूर परळी रेल्वेमार्गासाठी (Belapur Parli Railway) बेलापूर- परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेने या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन व जनआंदोलन (Movement) उभारून नव्याने लोहमार्गासाठी प्रयत्न केल्यास मी स्वतः यात लक्ष घालून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करील, अशी ग्वाही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister of State for Railways Raosaheb Danve) यांनी दिली.

...तर बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी लक्ष घालणार
Good Bye 2021 : गुन्हेगारीइतकेच नेवासा पोलीस ठाणेही चर्चेत

ना. दानवे नेवासा तालुक्यातील (Newasa) एका खासगी कार्यक्रमास आले असता बेलापूर परळी रेल्वे (Belapur Parli Railway) सेवा संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आ.बाळासाहेब मुरकुटे (Former MLA Balasaheb Murkute), रेल्वे सेवा संस्थेचे अध्यक्ष नबाब शहा, सचिव रितेश भंडारी, खजिनदार कारभारी गरड, सहसचिव निसार सय्यद उपस्थित होते.

...तर बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी लक्ष घालणार
बेलापूर परळी रेल्वे मार्गाला केंद्राच्या मंजुरीसाठी खा. लोखंडे यांनी लक्ष घालावे

प्रलंबीत लोहमार्गावर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur), नेवासा (Newasa) , शेवगाव (Shevgav), बीड जिल्ह्यातील गेवराई (Beed Gevrai), परभणी (Parbhani) जिल्ह्यातील माजलगाव व परळी (Parli) या तालुक्यांचा समावेश आहे. या सहाही तालुक्यातील लोकप्रतिनिधींना एकत्रीतपणे केंद्रिय रेल्वेमंत्र्यांसमवेत एकाच व्यसापिठावर आणणेबाबत रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे पदाधिकारी प्रयत्न करणार आहेत. तसेच सहाही तालुक्यात एकाच वेळी जनआंदोलन उभारण्याबाबत नियोजन करणार आहेत.

...तर बेलापूर-परळी रेल्वेमार्गासाठी लक्ष घालणार
नगर-परळी रेल्वे मार्गासाठी 90 कोटी

50 टक्के राज्यशासन खर्चाचा सहभाग देण्यास तयार असल्याचे पत्रही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) यांनी दिलेले असून ते रेल्वे बोर्डाकडे दिले आहे. त्याच प्रमाणे या जुन्या प्रलंबीत लोहमार्गासाठी सुमारे 3 कोटी 80 लाखांचा खर्चही करण्यात आलेला आहे. म्हणून पुन्हा नव्याने लोहमार्गाचे मागणी करणे व लढा उभारणे असे सांगुन ना. दानवे यांनी योग्य पर्याय दिल्याची भावना रेल्वे प्रवासी सेवा संस्थेच्या पदाधिका-यांमध्ये आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com