पत्नी माहेरी गेलेली, घरी पतीची गळफास घेवून आत्महत्या

उलट सुलट चर्चेला उधाण
पत्नी माहेरी गेलेली, घरी पतीची गळफास घेवून आत्महत्या

श्रीरामपूर | प्रतिनिधी

तालुक्यातील बेलापूर (Belapur) येथील सुनिल विनायक गायकवाड (वय ४३) याने घरातच साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या (suicide) केली.

या बाबत मिळालेली माहीती अशी की सुनिल गायकवाड यांने काल सायंकाळी घरातील छताला असलेल्या पंख्याला साडी बांधुन गळफास घेतला. सुनिलची पत्नी माहेरी गेलेली होती. घरात कुणीही नसल्यामुळे ही बाब उशीरा लक्षात आली. तोपर्यत सुनिल मयत झालेला होता.

घटनेची माहीती मिळताच बेलापुर पोलीस स्टेशनचे (Belapur Police Station) हवालदार अतुल लोटके आपल्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी पोहोचले. सुनिल यास खाली उतरुन श्रीरामपुर येथील साखर कामगार हाँस्पीटलला दाखल केले असता डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. बेलापुर येथील स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे पोलीस पाटील अशोक प्रधान उपस्थित होते. काही दिवसापासून सुनिल हा प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची गावात चर्चा सुरु असुन सुनिलच्या आत्महत्येचे खरे कारण काय? या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी व चार लहान मुली, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com