'त्या' गोट्यासोबत अनेकांनी काढले सेल्फी

'त्या' गोट्यासोबत अनेकांनी काढले सेल्फी

बेलापूर (वार्ताहर)-

आजच्या युगात शेतीकरीता बैलाऐवजी यंत्रांचा वापर होवू लागल्यान बैल दिसेनासे झाले आहेत. आता केवळ सणाकरीता मातीचेच बैल बाजारात दिसू लागले आहे. येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने हौस म्हणून पाळलेल्या बैलाला पहाण्याकरीता बाजारपेठेत काल मोठी गर्दी झाली होती.

बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सर्फराज उर्फ भैय्या जमालभाई शेख यांनी पाळलेल्या गावरान गायीच्या गोह्याचे संगोपन केले. थोडा मोठा झाल्यावर त्या बैलाला खरेदी करण्याकरीता व्यापारी आले असता त्यांचे चिरंजीव रिहान व आयान यांनी बैलाला विकण्यास मनाई केली. बालहाट्टापायी त्यांनी बैल न विकता पाळण्याचे ठरविले. त्यांचा हॉटेल व्यवसाय असल्याने त्यांनी त्यास हॉटेलापुढे बांधून चांगली व्यवस्था ठेवली. अनेक ग्राहक बैलासोबत सेल्फी घेवू लागले. त्यामुळे सर्फराज यांचाही उत्साह वाढला. बैल आज सहा वर्षाचा झाला असून त्याचे वजन ८९ किलो व उंची अडीच फुट आहे.

निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी दोनवेळा भेट देवून या बैलाची व शेख यांची स्तुती केली. बैलाला सोलापूर येथील एका शेतकऱ्यांने सहा लाख रुपयांना मागीतले होते, परंतू रेहान व आयान यांच्या हट्टापायी आता त्या बैलाचे संगोपन करण्याचा निर्णय शेख परिवाराने घेतला आहे. त्यांनी त्याचे नाव गोट्या ठेवले आहे. काल त्यांनी बैलाला बेलापूर गावात आणले असता, त्याला पहाण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. अखेर त्यांनी बैलाला बेलापुराच्या पेठेतून फिरविले. अनेकांनी गोट्याबरोबर फोटो काढणे पसंत केले. बऱ्याच जणांनी गोट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. खरोखरच पोळ्याच्या सणानिमित्ताने केवळ कागदावरच राहीलेली शेतकऱ्यांकडील खिलारी बैलजोडी पुन्हा दिसेल का ? सजीव बैलाकरीता असणारा बैल पोळा आता मातीने बनविल्या जाणाऱ्या बैलावर साजरा करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com