बेलापूर खुर्द सोसायटीच्या चेअरमनपदी पुजारी व्हा. चेअरमन बारहाते यांची बिनविरोध निवड

बेलापूर खुर्द सोसायटीच्या चेअरमनपदी पुजारी व्हा. चेअरमन बारहाते यांची बिनविरोध निवड

बेलापूर |वार्ताहर| Belapur

बेलापूर खुर्द सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सर्वाधिक मतांनी विजयी झालेले सेवानिवृत्त कृषि अधिकारी भाऊसाहेब मुकींदा तथा बी. एम. पुजारी यांची तर व्हाईस चेअरमनपदी बाबासाहेब निवृत्ती बारहाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री हरिहर विकास मंडळाच्या अधिपत्याखाली अध्यक्ष सुरेश भगत, उपाध्यक्ष कृष्णा पा. गाढे, बी. एम. पुजारी, उपसरपंच अ‍ॅड. दिपक बारहाते, माजी सरपंच सुनील क्षीरसागर, गोरक्षनाथ भगत, केशव गोविंद देवस्थानचे विश्वस्त विनय भगत, अनिल गाढे यांच्या नेतृत्वाखाली सर्वच्या सर्व तेरा जागा मोठ्या फरकाने जिंकून एकहाती सता मिळविली.

त्यानंतर नूतन पदाधिकारी निवडीसाठी सहकार सहनिबंधक संदीप रुद्राक्षे यांच्या अधिपत्याखाली संचालकांची बैठक घेण्यात आली. त्यात चेअरमन पदासाठी बी. एम. पुजारी यांच्या नावाची सूचना कैलास भगत यांनी मांडली. त्यास रामदास बडधे यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमन पदासाठी बाबासाहेब बारहाते यांच्या नावाची सूचना गोरक्षनाथ भगत यांनी मांडली, त्यास बाळासाहेब जोशी यांनी अनुमोदन दिले. यावेळी स्विकृत संचालक म्हणून मधुकर पाटील, भास्कर लोखंडे आणि राहुल गायकवाड यांची निवड करण्यात आली.

या बैठकीला नवनिर्वाचित संचालक सर्वश्री. बी. एम. पुजारी, बाबासाहेब बारहाते, गोरक्षनाथ भगत, रामदास बडधे, रमेश पुजारी, बाळासाहेब जोशी, शशिकांत पुजारी, विजय भगत, कैलास भगत, रामनाथ राशीनकर, प्रकाश थोरात, श्रीमती सुनंदा पुजारी, सुनंदा हरदास, सचिव रमेश भगत आदी उपस्थित होते.

निवडीनंतर झालेल्या छोटेखानी सभेत नवनिर्वाचित चेअरमन बी. एम. पुजारी व व्हा. चेअरमन बाबासाहेब बारहाते यांनी सर्वांच्या सहकार्याने संस्था व सभासदांभिमुख कारभार करुन संस्थेची प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.

यावेळी सर्वश्री मंडळाचे अध्यक्ष सुरेश भगत, उपाध्यक्ष कृष्णा पा. गाढे, बापुसाहेब बडधे, ग्रा. पं. उपसरपंच अ‍ॅड. दिपक बारहाते, माजी सरपंच सुनील क्षीरसागर, सदस्य अनिल गाढे, वसंत पुजारी, राजेंद्र बारहाते, दिलीप भगत, अनिल पुजारी, विनय भगत, माजी उपसरपंच शरद पुजारी, धनंजय हरदास, सदस्या प्रणाली भगत, सुरेखा क्षीरसागर, सविता राजुळे, राणी पुजारी, कल्पना भगत, नयना बडधे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.