बेलापूर |वार्ताहर| Belpaur

केसापूर -बेलापूर खुर्द रस्ता गेल्या सुमारे पंचवीस वर्षापासून अतिक्रमणामुळे बंद होता. तो आता दोन्ही गावांतील नागरिकांच्या सहयोगातून जाण्या-येण्यासाठी खुला झाला आहे.

यासंदर्भात दोन्ही गावांतील नागरिकांनी बैठक घेऊन कुठलाही वाद न करता अतिक्रमण काढून रस्त्याच्या बाजूने साईडगटारसह सोळा फूट रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. या रस्त्याला आमदार लहूजी कानडे यांच्या निधीतून खडीकरणासाठी निधीतून काम चालू करण्यात आले.

यावेळी केसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच काका पवार, दादा मेहेत्रे, अनिल भगत, सतीश रणदिवे, बापू पटारे, संभाजी शेलार, बेलापूर खुर्दचे उपसरपंच अॅड. दीपक बारहाते, विनय भगत, दिलीप भगत, कल्पना भगत, बबन जाधव, चंद्रकांत भगत, राजेंद्र भगत, कारभारी भगत, विलास भगत, शरद पुजारी तसेच दोन्ही गावातील मान्यवर उपस्थित होते.