विनापोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन काढल्याबद्दल आयोजित कार्यक्रमावरुन बेलापुरात रंगले राजकीय नाट्य

विनापोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन काढल्याबद्दल आयोजित कार्यक्रमावरुन बेलापुरात रंगले राजकीय नाट्य

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

बेलापूर येथे गणेश विसर्जन मिरवणूक विना पोलीस बंदोबस्तात काढली म्हणून पोलीस अधिक्षक यांनी कौतुक करुन बेलापूरच्या या कार्यक्रमाचे श्रेय घेण्यावरुन स्थानिक नेते मंडळींमध्ये मान-अपमान व आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच रंगले आहे.

बेलापूर येथे गणेशोत्सव कार्यक्रम दरम्यान पोलिसांचे सहकार्य न घेता गणेशोत्सव साजरा केला आणि विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. तसेच गणेश मंडळांनी जिवंत देखावे सादर केल्याबद्दल मंगळवारी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात बेलापूरची उंची पोलीस अधिक्षकांनी वाढविल्यामुळे हे कोणामुळे आणि कोणी केले याबाबत मानपान आणि श्रेयवादावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या कार्यक्रमाची कुठेतरी वाहवाह झाली पाहिजे आणि गावातील हा एक नवीन मुद्दा लोकांसमोर आणून पाठ कशी थोपटून घेता येईल यासाठीचा हा खटाटोप असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

गणेशोत्सवाबाबत ज्यावेळी शांतता समितीची बैठक झाली त्यावेळी गावातील सर्व प्रमुख लोकांनी एकमुखाने हा निर्णय घेतला होता. गणेशोत्सव सर्व ग्रामस्थांनी मिळून साजरा केला. गणेशविसर्जन मिरवणूकही सर्वानी मिळून विना पोलीस बंदोबस्त पार पाडली. यामध्ये सत्ताधारी, विरोधक व सर्व ग्रामस्थांचे सहकार्य होते. मात्र नुकताच पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत जो कार्यक्रम झाला त्यात ग्रामपंचायतमधील सत्ताधारी गटाने निमंत्रण दिले नसल्याचा आरोप सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सुधीर नवले यांनी केला आहे.

तर याबाबत उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले विरोधी गटाचे अरुण नाईक, रविंद्र खटोड, भरत साळुंके आदींना ग्रामपंचायतीकडून समक्ष फोन केले गेले. सुधीर नवले यांचा संपर्क न झाल्याने त्यांना मेसेज पाठवण्यात आला होता. त्यामुळे निमंत्रण मिळाले नाही हा आरोप चुकीचा आहे. विना पोलीस बंदोबस्त मिरवणूक यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आहे. आम्ही एकटे श्रेय घेत नाही असा खुलासाही त्यांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com