गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू

शेलार कुटुंबीयांना मदतीचे अवाहन
गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या ‘त्या’ मुलीचा मृत्यू

बेलापुर | प्रतिनिधी

गॅस गळतीमुळे स्फोट होवुन गंभीर जखमी झालेल्या शेलार कुटुंबातील नमश्री या मुलीचा उपचार सुरु असताना आज सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बेलापुर येथील गाढे गल्लीत राहणारे शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात गँस गळतीमुळे मोठा स्फोट झाला होता. त्यात घरातील चौघेही गंभीर भाजले होते. त्यांना प्रथम कामगार हॉस्पिटल व नंतर प्रवरा नगर येथे हलविण्यात आले होते.

यातील शशिकांत शेलार यांची मुलगी नमश्री (वय वर्ष ९) हीचे उपचार सुरु असतानाच आज सकाळी निधन झाले. तिच्यावर शेलार स्मशानभुमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शेलार कुटुंबीयातील तिघावर अजुनही प्रवरानगर येथील दवाखान्यात उपचार सुरु असुन या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे तरी आपण या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे असे अवाहन पत्रकार देविदास देसाई यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com