कामगाराच्या डोक्यात फोडली बियरची बाटली

‘या’ कारणातून घडली घटना
कामगाराच्या डोक्यात फोडली बियरची बाटली

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

एमआयडीसीमध्ये ठेकेदारी पध्दतीने काम करणार्‍या कामगाराला पगाराचे पैसे मागितल्याबद्दल तिघांनी मारहाण केली. सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात रविवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी शुभम पोपटराव आव्हाड (वय 23 रा. कलानगर चौक, गुलमोहर रस्ता, सावेडी) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निरंजन चव्हाण, ओंकार चव्हाण, उदय भगत (सर्व रा. शेंडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभम आव्हाड हे एमआयडीसीतील इटन इंडस्ट्रीत मागील सहा महिन्यांपासून ट्रेनिंग इंजिनियर म्हणून खासगी ठेकेदार परेश पाटील यांच्यामार्फत काम करत होते. शुभम यांनी 30 जून, 2022 रोजी कंपनीतील काम सोडून दिले होते. या कामाच्या पैशांची त्यांनी ठेकेदार पाटील यांच्याकडे वारंवार मागणी केली असता, त्यांनी रविवारी सायंकाळी साडेसात वाजता सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी चौकात बोलविले. शुभम हे त्याठिकाणी गेले असता, त्या ठिकाणी तीन जण आगोदरच येऊन थांबलेले होते.

उदय भगत याने शुभम कोण आहे? अशी विचारणा केली. त्यावेळेस मीच आहे असे म्हणताच, त्याने कानामागे मारली. निरंजन चव्हाण यांनीही हातातली बियर डोक्यात मारली, त्यामुळे रक्त आले. ओंकार चव्हाण यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पगाराचे पैसे मागितल्यास मारून टाकण्याची धमकी दिली. शुभमचा मित्र अनिकेत साळवे यालाही अशीच मारहाण झालेली आहे. या मारहाणीत त्याचा विवो कंपनीचा मोबाईल गहाळ झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com