झेंडीगेटला 500 किलो गोमांस पकडले

टेम्पोसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; कोतवाली पोलिसांची कारवाई
झेंडीगेटला 500 किलो गोमांस पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्रीसाठी घेऊन जाणारा आयशर टेम्पो कोतवाली पोलिसांनी पकडला. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास झेंडीगेट परिसरातील बुथ हॉस्पिटलच्या भिंतीलगत ही कारवाई केली. याप्रकरणी मोहसीन मुसा शेख (वय 33 रा. कोठला) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार दीपक रोहकले यांनी फिर्याद दिली आहे. शेख याच्या ताब्यातून 75 हजार रुपये किंमतीचे 500 किलो गोमांस व पाच लाख 50 हजार रुपये किंमतीचा आयशर टेम्पो (एमएच 15 एफव्ही 1351) असा सहा लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुने जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील बुथ हॉस्पिटलच्या भिंतीलगत एक गोमांस असलेला आयशर टेम्पो उभा असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार रोहकले, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, सुजय हिवाळे, संदीप थोरात, तान्हाजी पवार यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने नमूद ठिकाणी पंचासमक्ष जाऊन खात्री केली असता मोहसीन शेख याच्या ताब्यातील टेम्पोमध्ये 500 किलो गोमांस मिळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गोमांस व टेम्पो जप्त केला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com