गोमांस विक्री दुकानावर छापे

भिंगार पोलिसांची कारवाई || तिघांविरूध्द गुन्हा || 29 हजारांचा मुद्देमाल जप्त
गोमांस विक्री दुकानावर छापे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंगार शहरातील आलमगीर परिसरात गोमांस विक्री करणार्‍या तिघांवर भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्याकडील गोमांस व इतर साहित्य असा 29 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार सचिन धोंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम उर्फ बबा बुढण कुरेशी (वय 63 रा. सदर बाजार, भिंगार), नावेद सादीक कुरेशी (वय 38), गुफरान शब्बीर कुरेशी (वय 32, दोघे रा. हमालवाडा, व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) अशी त्यांची नावे आहेत. मंगळवारी सकाळी पोलिसांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, आलमगीर परिसरातील असीम किराणा दुकाना समोर, असीम किराणा दुकानाशेजारी व तांबोळी यांच्या घरासमोर दुकानामध्ये काही इसम गोमांस विक्री करत आहेत.

निरीक्षक देशमुख यांनी पोलीस अंमलदार व्ही.आर.गारूडकर, ए.एन.नगरे, आर.आर.व्दारके, आर.टी.गोरे, भानुदास खेडकर, धोंडे, एस.आर.शेख, आर.एन.कुलांगे यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने नमूद ठिकाणी कारवाई करून 145 किलो गोमांस, वजन काटे व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com