दीड हजार किलो गोमांस जप्त; 9 जणांवर गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेची छापेमारी || 5 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त
दीड हजार किलो गोमांस जप्त; 9 जणांवर गुन्हे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 1 हजार 690 किलो गोमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापा टाकून सर्जेपुरा परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल 5 लाख 39 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

वसीम शाबीर कुरेशी (वय 38, रा. व्यापारी मोहल्ला, जुने कलेक्टर ऑफिस मागे, नगर), वसीम कदीर कुरेशी (रा. झेंडीगेट, नगर), इम्रान सलीम कुरेशी (वय 25, रा. सदर बाजार, भिंगार), मोहसीन बाबा मिया कुरेशी (वय 41, रा. कोठला मैदान, नगर) तरबेज आबीद कुरेशी, राजीक अफरोज कुरेशी, इरफान मुसा कुरेशी, आबीद बाबुलाल कुरशी, मुजाहिद ऊर्फ बाबुलाल कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना शहरासह परिसरात गोवंशीय मास विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार त्यांनी पथकास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गुन्हे शाखेतील पथक तुषार धाकराव, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सचिन आडबल, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, सागर ससाणे, मयुर गायकवाड, मच्छिंद्र बर्डे, रोहित येमुल, रणजीत जाधव, विजय धनेधर व उमाकांत गावडे यांनी वसीम कुरेशी हा त्याचे हस्तका मार्फत सर्जेपुरा ते सिव्हील हॉस्पिटल मार्गे एका काळ्या पिवळ्या रिक्षातुन गोमासची वाहतूक करत असतांना मिळून आला. तर कोठला झोपडपट्टी, गॅरेज लाईन परिसरात पत्र्याचे शेडमधील गोवंश जनावरांची कत्तल करुन गोमास विक्री करणारा ताब्यात घेतला. असा एकूण 5 लाख 39 हजार मुद्देमाल हस्तगत केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com