
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
गोवंशीय जनावरांची कत्तल (Slaughter of Animals) करून गोमांस विक्री करणार्या दोघांवर कोतवाली पोलिसांची (Kotwali Police) रविवारी सकाळी कारवाई केली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार कैलास शिरसाठ यांनी फिर्याद दिली आहे.
साहेल जावेद कुरेशी (वय 26), शहेबाज गुलाम साबीर सय्यद (वय 19, दोघे रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. रविवारी सकाळी कोतवाली पोलिसांना (Kotwali Police) माहीती मिळाली की, नगर शहरातील झेंडीगेट (Zendigate) परिसरातील काही इसम सुभेदार गल्ली येथे गोवंशी जनावरांच्या मांसाची विक्री करत आहे, अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे उपनिरीक्षक मनोज कचरे हे त्यांचे पथकासह झेंडीगेट ( Zendigate) परिसरातील नमुद ठिकाणी जावून खात्री केली असता सदर दोन्ही ठिकाणी मांस विक्री सुरू असल्याचे दिसले.
पथकाची खात्री होताच तेथे छापा (Raid) टाकुन सदर दोन्ही ठिकाणी इसमास ताब्यात घेतले. त्यांचे पत्र्याचे टपरीची झडती घेतली असता तेथे सदर ठिकाणी 550 किलो गोमांस, दोन सत्तुर व दोन वजनकाटे असा एकून एक लाख 11 हजार रूपये किंमतीचा मुददेमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे.
सदरची कारवाई निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कचरे, अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, सुजय हिवाळे, सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.