झेंडीगेट येथे गोमांस विक्री करणार्‍या दुकानावर कारवाई

पोलीसांच्या छाप्यात 60 किलो मांस जप्त
झेंडीगेट येथे गोमांस विक्री करणार्‍या दुकानावर कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील (Kotwali Police Station) शहरातील झेंडीगेट भागात (Zendigate Area) अशरफीक मस्जिदजवळ पत्र्याचे शेडमध्ये मुन्ना कुरेशी (पुर्ण नाव माहित नाही) राहणार झेंडीगेट आंबेडकर चौक नगर याच्या मालकीच्या व त्याच्या सांगण्यावरुन इजाज अहमद शेख (वय 45), रा. हातमपुरा चौक नगर याने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय मासांची विक्री करण्यास मनाई असतानाही मांस (Meat) उपलब्ध करून विक्री (Sales) करण्याचे उद्देशाने विनापरवाना व बेकायदा (Unlicensed and illegal) ताब्यात ठेवले होते. त्या कोतवाली पोलीसांनी छापा (Kotwali Police Raid) टाकून विनापरवाना 60 किलो मांस ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, या दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्याचे (Kotwali Police Station) हवालदार तानाजी पवार यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम 26, 9 सह महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधरणा) अधिनय 1,99, 5 चे कलम 5 (क), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Crime) केला आहे. कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे (Kotwali PI Sampat Shinde) यांना बातमीदारामार्फत माहितीनूसार शहरातील झेंडीगेट भागात (Zendigate Area) अशरफीक मश्जिद जवळील पत्र्याच्या शेडमध्ये काही इसम गोवंशीय मासांचे विक्री (Sale of Beef) करत असल्याचे कळाले होते.

त्याठिकाणी निरीक्षक शिंदे यांच्या आदेशानूसार पोलीसांच्या पथकाने छापा (Police Raid) टाकला असता, गोमांस व त्याची विक्री करणारे इसमास ताब्यात घेवून चौकशी (Investigation) केली असता दुकानाचा मालक मुन्ना कुरेशी झेंडीगेट (Zendigate) आणि त्यांच्या सांगण्यावरून ईजाज अहमद शेख करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल (Filed a Crime) करण्यात आले असून 9 हजार 200 किंमतीचे 60 किलो मांस जप्त (Seized) करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.