
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
गोवंशीय जातीच्या जनावरांचे कत्तल केलेल्या मांसासह 4 लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करुन आरोपीला अटक केली. श्रीरामपूर शहर पोलीसांनी काल दुपारी ही कारवाई केली.
शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, धनगरवस्ती परिसर, वार्ड नं. 2, श्रीरामपूर, येथे एक इसम त्याच्याकडील पांढर्या रंगाच्या कारमध्ये कत्तल केलेल्या गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करण्यासाठी घेऊन जाणार आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी बिट अधिकारी पोलीस उपनिरिक्षक मगरे व बिट अंमलदार यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी लागलीच दोन पंच व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अनिल भांड यांना पाचारण करत धनगरवस्ती परिसररात छापा टाकला असता तेथे एक पांढर्या रंगाची महिंद्रा कंपनीची कार (नं. एमएच 23 वाय 6099) उभी दिसली. त्या गाडीच्या मागच्या डिक्कीमध्ये एक इसम गोवंशीय जनावरांचे कत्तल केलेले मास भरत असताना दिसला.
पोलीसांनी त्याला ताब्यात घेत नाव विचारले असता त्याने मुजाहिद मुस्ताक कुरेशी (वय 23, रा. कुरेशी जमातखाना, वार्ड नं. 2, श्रीरामपूर) असे सांगितले. गाडीची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यात गोवंशीय जातीचे जनावरांची कत्तल करून बारीक तुकडे केलेले गोवंशीय मांस अंदाजे वजन 450 किलो (किंमत 63 हजार रुपये), 4 लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची कार असा एकुण 4 लाख 63 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मुजाहिद मुस्ताक कुरेशी याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पो. स्टे. येथे गुन्हा रजि. क्र. 481/2023 महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 सुधारित कायदा सन 2015 चे कलम 5, 5 (ब), 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असूण आरोपीा अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचेकडील वार्ड नं. 2 चौकीचे विट अधिकारी पोलीस उपनिरिक्षक मगरे व बिट अंमलदार शफिक शेख, अमोल जाधव, भैरव आडागळे, आर.ओ. कारखेले, शिवाजी बडे, आजिनाथ आंधळे यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल जाधव हे करीत आहेत.