पावणे तीन लाखांचे गो मांस पकडले

नगर तालुका पोलिसांची कामगिरी
पावणे तीन लाखांचे गो मांस पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रात्रीची गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना एक संशयित टेम्पो जात असताना आढळला. त्यांनी लगेच त्याचा पाठलाग सुरू केला. तत्पूर्वी तो टेम्पो पुणे-अहमदनगर हायवेने कामरगाव-चास शिवारामध्ये पोहोचला होता. त्या टेम्पोमधील 2 लाख 70 हजार रुपये किमतीचे जनावराचे मांस जप्त करण्यात आले. गोमांस आणि महिंद्रा कंपनीची पिकअप असा सहा लाख 70 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टेम्पो चालक किरण पांडुरंग कुंभार (राहणार शिंदेवाडी, देशमुख वाडी, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) हा गोमास जातीचे मांस अवैधरित्या त्याच्या पिकअप गाडीमध्ये घेऊन जात असताना त्याला पकडले असता त्याने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी त्याला अधिक विश्वासमध्ये घेऊन चौकशी केली असता त्याने सदरचे गोमास नगर शहरामधील अरबाज गुलाम रसूल कुरेशी याच्या मालकीचे असल्याचे सांगितले.

नगर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा विधेयक 1995 चे कलम 5 (क)4 चे उल्लंघन 8 व 9,9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक व गोमास मालक यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, सहाय्यक फौजदार इथापे व हवालदार धर्मराज दहिफळे यांनी केलेली आहे.

Related Stories

No stories found.