दीड हजार किलो गोमांस पकडले

एलसीबीची कारवाई; एकाला अटक
दीड हजार किलो गोमांस पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गोवंशीय जनावरांची कत्तल करून ते टेम्पोमध्ये भरून विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकाला पकडले. त्याच्याकडून दोन लाख 25 हजार रूपये किंमतीचे एक हजार 500 किलो गोमांस व 10 लाख रुपये किंमतीचा टेम्पो असा 12 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार संदीप घोडके यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अब्दुल हक कुरेशी ऊर्फ काका व गुलाब बनीलाल शेख (वय 32 रा. खेड ता. कर्जत) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुलाब शेख याला ताब्यात घेत अटक केली आहे. झेंडीगेट, कुरेशी मोहल्ला येथे अब्दुल हक कुरेशी हा त्याचे घरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस टेम्पो (एमएच 3 डीव्ही 0368) मध्ये भरून विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी सहाय्यक निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस अंमलदार भाऊसाहेब काळे, बबन मखरे, विजयकुमार वेठेकर, सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोंढे, संदीप चव्हाण, रवींद्र घुंगासे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित यमुल, गावडे, बबन बेरड यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

पथकाने रविवारी सायंकाळी नमूद ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता टेम्पो मध्ये गुलाब शेख मिळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमध्ये गोमांस मिळून आले. पोलिसांनी शेख याच्याकडे चौकशी केली असता अब्दुल हक कुरेशी याने टेम्पोमध्ये गोमांस भरले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी टेम्पोसह गोमांस ताब्यात घेत गुलाब शेख याला अटक केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com