अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
झेंडीगेट परिसरातील कुरेशी मोहल्ला येथे मोकळ्या जागेत गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणार्या एकाला कोतवाली पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे 200 किलो गोमांस जप्त केले आहे. पोलीस अंमलदार दीपक रोहकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुज्जु जानीलमिया कुरेशी (वय 35 रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) असे गोमांस विक्री करताना पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
कुरेशी मोहल्ला येथे एका मोकळ्या जागेत जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार योगेश भिंगारदिवे, रोहकले, संतोष गोमसाळे, अमोल गाडे, अतुल काजळे, सुजय हिवाळे, तानाजी पवार यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पोलिसांनी कुरेशी मोहल्ला येथे मोकळ्या जागेत छापा टाकला असता तेथे मुज्जु कुरेशी गोवंशीय जनावरांची कत्तल करून विक्री करताना मिळून आला. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.