
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
शहरातील बोरावके महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस एका भंगार व्यावसायिकास भंगाराचे पैसे आणलेस का? असे म्हणत त्यास मारहाण करत त्याच्याकडील पैसे काढून घेतले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पाच ते सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील बोरावके महाविद्यालयाच्या पाठीमागील ठिकाणी आदम युसूफ शहा (रा. वॉर्ड नं. 2) या भंगार व्यावसायिकास चौघांनी रस्त्यात अडवून तू भंगारचे पैसे आणलेस का? असे म्हणत त्यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याजवळ असलेले पैसे काढून घेतले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आदम युसूफ शहा यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी शेख बागवान, शरीफ असलम उर्फ गल्लू यांच्यासह चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.