दगड व विटांनी एकास मारहाण; गुन्हा दाखल

दगड व विटांनी एकास मारहाण; गुन्हा दाखल

नेवासा (तालुका वार्ताहर)

'तू दारू विकतोस' असे म्हणाल्याचा राग आल्याने एकास दगड व विटांनी मारहाण केल्याची घटना नेवासा तालुक्यातील निपाणीनिमगाव येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माणिक रामराव उंदरे (वय ५५) धंदा-शेती रा. निपानी निमगाव ता. नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान मी मारुती मंदिराच्या समोर बसलेलो असताना तेथे बसलेला शिवाजी जगन्नाथ आदमने यास 'तू दारू विकतो' असे म्हणालो. त्याचा राग आल्याने त्याने मला शिवीगाळ करून विटाने व दगडाने माझ्या डोक्यात, उजव्या हाताला व डाव्या मांडीला मारहाण करून जखमी केले व 'माझा नाद करायचा नाही' अशी धमकी दिली.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी शिवाजी जगन्नाथ आदमने याचेविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब कोळपे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com