
सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई (Sonai) येथे मंगळवारी दुपारी जागेच्या कारणावरून डोळ्यात मिरचीची पूड टाकून, शिवीगाळ व लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) करत विनयभंग (Molested) केल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
जागेच्या कारणावरून जेसीबी (JCB) बोलावून आमचे जागेवरील माती का काढली असे म्हणून शिवीगाळ करून फिर्यादीच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली व लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत जीवे मारण्याची धमकी (Threat) दिली. या फिर्यादीवरुन अकबर गफूर सय्यद, रेश्मा अकबर सय्यद, साहिल अकबर सय्यद, वसीम अकबर सय्यद रा. कुंभार गल्ली, सोनई यांचेवर सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) भारतीय दंड विधान कलम 354, 324, 323, 504, 506, 427, 34 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे करत आहे.