पत्नी व मेव्हणीच्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रवरासंगमच्या तरुणाचा मृत्यू

नेवासा पोलीस ठाण्यात दोघींवर खुनाचे वाढीव कलम
पत्नी व मेव्हणीच्या मारहाणीत जखमी झालेल्या प्रवरासंगमच्या तरुणाचा मृत्यू

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

दारु पिवून भांडण करतो या कारणावरुन तरुणास पत्नी व मेव्हणीने लाकडाने मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या तालुक्यातील प्रवरासंगमच्या घटनेतील तरुणाचा अखेर औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी दोघींवर खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

याबाबत संभाजी काळूराम धनवटे (वय 32) धंदा- पोकलॅण्ड ऑपरेटर रा. प्रवरासंगम यांनी फिर्याद दिली होती कील त्यांचा मोठा भाऊ सुभाष काळूराम धनवटे (वय 42) हा जवळच त्याची बायको व दोन मुले यांचेसह वेगळा राहवयास आहे. घरापासून थोड्या अंतरावर वहिनी शोभा सुभाष धनवटे हिची बहिण संगीता राजू चव्हाण ही तिच्या मुलीसह राहवयास आहे.

1 मे रोजी सायंकाळी साडेसात ते 2 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान संगीता चव्हाण हिचे घरासमोर व घरात प्रवरासंगम येथे भाऊ सुभाष काळूराम धनवटे यास माझी वहिनी शोभा सुभाष धनवटे व तिची बहिण संगीता चव्हाण या दोघींनी त्यास शिवीगाळ करुन हाताने व लाकडी बाजेच्या पायाने (लाकूड) उजव्या खांद्यावर डोक्यास पाठीमागील बाजूने, पोटावर व छातीवर व पायावर मारहाण करुन जबर मुका मार देवून त्यास राहते घरात बांधून ठेवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात सुभाष धनवटे याची पत्नी शोभा व मेव्हणी संगीता चव्हाण यांच्यावर गुन्हा रजिस्टर फर्स्ट भारतीय दंड विधान कलम 307, 342, 323, 504, 506, 34 प्रमाणे जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता.

जखमी सुभाष काळूराम धनवटे याच्यावर आधी नगरच्या आनंदऋषी हॉस्पीटल व नंतर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्याचे निधन झाल्याने नेवासा पोलिसांनी या गुन्ह्यात त्याची पत्नी शोभा सुभाष धनवटे व मेव्हणी संगीता राजू चव्हाण या दोघींवर खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे करत आहेत.

Related Stories

No stories found.