वाद्य वाजविणे बंद केल्याने मारहाण; दोघे जखमी

वाद्य वाजविणे बंद केल्याने मारहाण; दोघे जखमी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या साईकुबेर सिटी या उपनगरात घरभरणीच्या पूर्वतयारीचा विधिवत कार्यक्रम सुरू असताना तेथे आरोपी नकुल धर्मराज ठाकरे, शारदा नगर कोपरगाव, संकेत मगर, मयुर गायकवाड, ऋषी पवार, तुषार सोनवणे आदी आरोपींनी घटनास्थळी प्रवेश करून वाद्य वाजविण्याचे बंद केल्याच्या कारणावरून मारहाण करून एका माहिलेसह दोन जणांना मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी नकुल ठाकरे, तुषार सोनवणे या दोन आरोपींचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केले आहे.

फिर्यादी अभिजित दवंगे हा कोपरगाव शहरातील धारणगाव रोड येथील रहिवासी आहे. त्यांच्या मावशीच्या घरी नगर-मनमाड रोडलगत घरभरणीचा कार्यक्रम असल्याने तो आपल्या नातेवाईकांसह तेथे हजर होता. सदर ठिकाणी 20 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास वाद्य वाजविण्याची वेळ संपल्याने आपले वाद्य वाजविण्याचे काम बंद करून कार्यक्रम आटोपला होता. अशावेळी त्या घटनास्थळी आरोपी नकुल धर्मराज ठाकरे, शारदानगर, संकेत मगर, मयूर गायकवाड, ऋषी पवार, तुषार सोनवणे सर्व रा. कोपरगाव हे आले व त्यांनी रात्रीच्यावेळी अरेरावी करत आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून तुम्ही साउंड सिस्टीम बंद का केली? साउंड सिस्टीम चालू करा, आम्हाला नाचायचे आहे असे म्हणाले. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन आम्ही कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? आम्ही कोपरगावचे डॉन आहोत. आमच्या कुणी नादी लागत नाही अशी बढाई मारून आरोपी नकुल ठाकरे याने फिर्यादीस तेथे स्वयंपाकीने स्वयंपाकासाठी आणलेल्या लोखंडी उलथण्याचा वापर करून मारहाण करून त्यांना जखमी केले. याशिवाय सदर ठिकाणी असलेली पाहुणी महिला मनीषा डेंगळे, रा. निमगावजाळी या घटनेत जखमी झाल्या आहेत.

यातील आरोपी नकुल ठाकरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी पाच गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचे गांभीर्य वाढले आहे.

या घटनेची तत्काळ दखल घेत कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. देसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व त्यांच्या सहकार्‍यांनी आरोपी नकुल ठाकरे, तुषार सोनवणे यांना शोधून काढले. या दोन आरोपीनी पोलिसांना पाहून धूम ठोकली होती. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून जेरबंद केले.

पोलिसांनी हिसका दाखवला असता मुख्य आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणी फिर्यादी अभिजित दवंगे (वय-26) रा. धारणगाव रोड, कोपरगाव याने आरोपीविरुद्ध गुन्हा र. क्रं. 384/2022 भादंवि कलम 307 ,143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com