मारहाणीत सहकार्‍याचा मृत्यू; आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

मारहाणीत सहकार्‍याचा मृत्यू; आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भंगाराच्या दुकानात काम करणार्‍या सहकार्‍यास गंभीर मारहाण करून मृत्यूला कारणीभूत ठरलेल्याबद्दल महेश शिवराम निसाद (वय 29, रा. चकला, ता. तिंदवरी, जि. बांदा. उत्तर प्रदेश) याला 10 वर्ष सक्तमजुरीचा शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी ठोठावली. नगर शहरातील लक्ष्मी स्क्रॅप मर्चंट या भंगाराच्या दुकानात महेश निसाद आणि बाबूदिन झंडू निसाद हे दोघे काम करत होते.

16 जानेवारी 2021 रोजी रात्री दोघांमध्ये स्वयंपाक करण्यावरून भांडणे झाली. महेश याने बाबूदिन याला दुकानातील पहारीने मारहाण केली. या मारहाणीत बाबूदिन हा गंभीर जखमी झाला. दुकान मालक अशोक निसाद यांना ही बाब 17 जानेवारी रोजी सकाळी समजली. त्यांनी जखमी बाबूदिन याला उपचारासाठी प्रारंभी विखे रूग्णालयामध्ये दाखल केले. जास्त रक्तस्त्रावामुळे बाबूदिनचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. महेशविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सिध्द झाल्याने त्यास 10 वर्ष सक्तमजुरी आणि 25 हजार रूपये दंड. दंड न भरल्यास 6 महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ड. अनिल सरोदे यांनी सरकारतर्फे काम पाहिले. पोलिस अंमलदार के. एन. पारखे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com