पैशाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

6 जणांवर गुन्हा दाखल
पैशाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

खरेदी केलेल्या गायींचे राहिलेले पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना तालुक्यातील नजिकचिंचोली येथे घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरुण लक्ष्मण सरोदे (वय 29) रा. तेलकुडगाव ता. नेवासा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजी कर्जुले, ज्ञानदेव कर्जुले, पिंटू कर्जुले, सचिन कर्जुले, अनिल कर्जुले व नितीन कर्जुले सर्व रा. देवटाकळी ता. शेवगाव व इतर अनोळखी पाच ते सहा इसम (नाव माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हटले की, फिर्यादी याने यातील आरोपी याचे कडून दोन गाई विकत घेतल्या होत्या. सदर गाईचे काही पैसे त्या आरोपीस देणे बाकी होते. पैशाच्या कारणावरून फिर्यादीस आरोपी क्रमांक 1 ते 3 शिवाजी कर्जुले, ज्ञानदेव कर्जुले व पिंटू कर्जुले यांनी लाकडी दांड्याने व इतर आरोपींनी लाथाबुक्क्याने मारहाण करून फिर्यादीस जखमी केले. आरोपी शिवाजी कर्जुले याने फिर्यादीस जातिवाचक शिवीगाळ करून त्यास बांधून चारचाकी गाडीमध्ये बळजबरीने घेऊन जाऊन त्याचे ताब्यातील रोख रक्कम 46 हजार रुपये, सॅमसंग कंपनीचा पाच हजारांचा मोबाईल काढून घेऊन फिर्यादी जवळील चेकवर बळजबरीने सह्या घेतल्या.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 617/2022 भारतीय दंड विधान कलम 363, 365, 368, 327, 324, 147, 148, 149, 323, 504, 506, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(1),(आर),(एस) आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अधिकारी श्री. मिटके करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com