
लोणी |वार्ताहर| Loni
श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील गळनिंब (Galnimb) येथे आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून आठ जणांनी लोखंडी रॉड आणि कुर्हाडीने दोघांना मारहाण (Axe Beating) केली. त्यात एक जण गंभीर जखमी (Injured) झाला असून त्याच्यावर लोणीच्या प्रवरा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
अजय भास्कर पगारे (रा.गळनिंब ता.श्रीरामपूर) यांनी लोणी पोलिसात (Loni Police) दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या शेजारी राहणारा माझा चुलत भाऊ नानासाहेब दिलीप पगारे यांचे गावातील काही लोकांशी आर्थिक देवाण घेवाणीतून वाद (Dispute) झाले होते. लोणी पोलिसात त्याबाबत फिर्यादी दाखल आहे. ती मागे घेण्यासाठी नानासाहेब याला धमकी (Threat) देण्यात येत होती.
29 मे रोजी माझ्या कुरणपूर शिवारातील सिद्धेश्वर ऑटो सर्व्हिस सेंटर येथे नानासाहेब सायंकाळी 7 वा. दुचाकीवरून आला असता त्याच्या मागे नामदेव पाराजी ऐनोर, मारुती पाराजी ऐनोर, सागर दिनकर चिंधे, राहुल दिनकर चिंधे, पांडुरंग भागवत चिंधे, विष्णू भागवत चिंधे, महेश दत्तात्रय चिंधे, बबन भागाजी शेंडगे व तुषार दशरथ चिंधे हे दुचाकीवरून आले.
पोलीस स्टेशन मधील तक्रार मागे घेण्यासाठी ते वाद (Dispute) घालू लागले व नानासाहेब यास लाथाबुक्क्यांनी मारहाण (Beating) करू लागले. लोखंडी रॉडने मारहाण (Beating) केली. नामदेव ऐनोर याने लोखंडी कुर्हाड डोक्यात घातली. सागर चिंधे याने नानासाहेब याच्या गळ्यातील सोन्याची चैन (Gold Chain) काढून घेतली. महेश चिंधे याने खिशातील दुधाच्या पेमेंटचे 23 हजार रुपये काढून घेतले. इतर आरोपींनी नानासाहेब यास बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मी सोडवण्यासाठी गेलो असता मलाही लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केली. जखमी नानासाहेब यास लोणीच्या प्रवरा रुग्णालयात (Pravara Hospital) दाखल केले असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी लोणी पोलिसांनी अजय पगारे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरुद्ध गुन्हा रजि.नं.296/2023 भादंवि कलम 307,323,324,143,147,148,149,504,506,35(4) नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) केला. पुढील तपास सपोनि युवराज आठरे करीत आहेत.